दत्तनगर गल्लीत बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न झाल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे आंदोलन.
इचलकरंजी:
कबनुर दत्तनगर गल्ली नंबर १० गट क्रमांक १७७, मिळकत क्रमांक ४२७८ येथील बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल इचलकरंजीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.
ग्रामपंचायतीच्या पुराव्यानुसार संबंधित ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या मदरसा/प्रार्थना स्थळ उभारण्यात आले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच, ग्रामपंचायतीकडून दिला गेलेला ना हरकत दाखला संशयास्पद असून,त्यामागे आर्थिक व्यवहार झाला असावा,असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
संघटनेने कबनुर ग्रामपंचायतीत मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि बेकायदेशीर बांधकाम त्वरित पाडण्यात यावे. तसेच, संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.२० फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न झाल्यास संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर अमित कुंभार,सर्जेराव कुंभार,अमोल शिरगुप्पे, मुकुंदराज उरूणकर यांच्या सह्या आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800