डीकेटीईस इंस्टीटयूट इन्व्होवेशन रॅकिंग २०२४ या शैक्षणिक मानांकनांत फोर स्टारचे रेटिंग
इचलकरंजी:
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रलायाच्या पुढाकाराने देशातील दर्जेदार उच्च शिक्षण संस्थाच्या जाहीर केलेल्या इंस्टीटयूट इन्व्होवेशन रॅकिंग २३-२४ या शैक्षणिक मानांकनाच्या यादीत डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इंस्टीटयूट या एम्पॉवर्ड ऍटोनोमॉस महाविद्यालयास देशपातळीवर फोर स्टारचे रेटिंग जाहीर झाले आहे. इंस्टीटयूट इन्व्होवेशन रॅकिंग या मानांकनाला भारताच्या सर्व प्रमुख शैक्षणिक व व्यावसायिक गटांमध्ये व्यापक मान्यता आहे. देशामध्ये उच्च गुणवत्तेच्या संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी, उद्योजकता निर्माण करण्यसाठी आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्यासाठी ही मानांकन यादी नवचैतन्य निर्माण करणार आहे.
इंस्टीटयूट इन्व्होवेशन रॅकिंगसाठी संशोधन,विकास आणि उद्योजकता या निकषांच्या आधारावर देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे,महाविद्यालये यांची क्रमवारी ठरविण्यात येते. यामध्येे स्टार्टअप, संशोधन, उद्योगाला पुरक असे अद्ययावत शिक्षण, इंडस्ट्री सर्व्हिसेस, कन्सल्टंन्सी, इंडस्ट्री इंस्टीटयूटशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करार, नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रशिक्षण, प्लेसमेंट, उद्योग जगताशी असलेले संबंधाचे विश्लेषण, डीकेटीईच्या इनोव्हेशन सेलने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्यात नवनिर्मिती उद्योगजकतेसाठी प्रोत्साहन दिले आहे ज्यामुळे त्यांचे कौशल्य विकसीत झाले आहे. याशिवाय डीकेटीईच्या स्टार्टअप कटटयामुळे नवउदयोजकांना, विद्यार्थ्यांना संशोधनात मोलाची मदत झाली आहे. अशा विविध मुद्यांचा विचार करण्यात आला व देशपातळीवर डीकेटीईस फोर स्टारचे मानांकन जाहीर केलेे आहे.
फोर स्टार रेटिंग संपूर्ण डीकेटीई परिवारासाठी अभिमानस्पद क्षण आहे. इनोव्हेशन आणि इंटरप्रिनरशिप ची संस्कृती जोपसण्यासाठी डीकेटीई नेहमीच कटिबध्द असून युवा उद्योजकतामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे आणि त्यांना स्टार्टअपच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचे डीकेटीईचे ध्येय असून रोजगारनिर्मिती व स्टार्टअपसाठी हे फोर स्टार रेटिंग उत्कृष्टतेची मोहर असेल असा विश्वास संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या रेटिंगसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खजीनदार प्रकाश दत्तवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, ट्रस्टी, रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिटयूटचे डायरेक्टर, प्रा.डॉ एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, इन्सिटटयूटचे आयआयसी प्रेझिटंड डॉ.डी.व्ही. कोदवडे, समन्वयक डॉ. टी.आय.बागवान व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800