गडचिरोलीत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गडचिरोलीत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन संपन्न.

इचलकरंजी
              गडचिरोली वृतपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने संस्कृती सांस्कृतिक सभागृह गडचिरोली येथे वृतपत्र विक्रेता संघटनेचे दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन 26 व 27 जानेवारीला पार पडले.
           याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गडचिरोलीचे आमदार मा. श्री. डाॅ. मिलींदजी नरोटे, अध्यक्ष राज्य संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. सुनिलजी पाटणकर हे होते. त्यावेळी माजी आ. देवराव होळी, माजी आमदार श्री. नामदेव उसेंडी, माजी जि. प. उपाध्यक्ष श्री. मनोहर पोरटी, माजी नगराध्यक्ष श्री. सुरेश सा. पोरेड्डीवार, डॉ. अश्विनी यादव, नगरसेवक प्रमोद पिपरे, सामाजिक कार्यकर्ते जितूभाऊ धात्रक, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. बालाजी पवार, सरचिटणीस श्री. विकास सुर्यवंशी, कोषाध्यक्ष श्री. राजेन्द्र टिकार, सल्लागार शिवगोंडा खोत, छत्तीसगढ़ संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद कुमार सिन्हा, संजय पावसे, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष, दिनेश उके, संतोष शिरभाते, अण्णा जगताप, रंविंद्र कुलकर्णी, रघुनाथ कांबळे, संघटन सचिव विनोद पन्नासे, प्रकाश उन्हाळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
             अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री पाटणकर म्हणाले, वृतपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्या निकाली काढण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून गडचिरोली  जिल्हा संघटनेसह राज्यभरातील वृतपत्र विक्रेत्यांनी संघटनशक्ती मजबूत करावी असे आवाहन केले. उद्घाटक  आमदार डॉ. श्री. मिलिंद नरोटे म्हणाले, वृतपत्र विक्रेते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रमुख आधार स्तंभ आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम त्यांच्या पाठीशी राहू. डॉ. नामदेव उसेंडी यांनी विक्रेत्यांच्या कार्याचा गौरव करत भविष्यातील संघर्षासाठी  आपण कायम त्यांना सहकार्य करू असे आश्वासन दिले. डॉ. देवराव होळी यांनी भविष्यातील कार्यक्रमासाठी पाठींबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी. जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, डॉ. अश्विनी यादव, सरचिटणीस विकास सुर्यवंशी, सल्लागर शिवगोंडा खोत, विनोद कुमार सिन्हा, याच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमकर, अधिवेशन संयोजक राजेन्द्र गव्हारे, संजय आकरे, सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष प्रशांत वाढई, सहसचिव मारोती बाळेकरमकर, प्रसिद्ध अंकुश बोबाटे, संदीप आकरे, देवेंद्र बारापात्रे, पुरुषोत्तम रोळे, उमेश सोनटक्के, विलास बोंडे, ज्ञानेश्वर गोहणे, आकाश वैरागडे, प्रकाश बोबाटे, तेजस बोबाटे, प्रकाश घोगरे, दर्शन पिंजरकर  आदीनी सहकार्य केले. प्रस्ताविक राजेन्द्र गव्हारे यांनी केले. सुत्रसंचालन वैष्णवी दखने यांनी तर आभार प्रदर्शन संजय आकरे यांनी केले.
शहीद जवानांच्या आई-वडिलांचा सन्मान
शहीद पोलिस जवान सतिश जवान यांच्या आई-वडिलांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलिस दलात भर्ती होण्यापुर्वी सतिश कसनवार यांनी अनेक वर्षे गडचिरोली शहरात वृतपत्र वितरणाचे काम केले होते.
संघटनेकडून विषेश सत्कार
विषेश दत्तक संस्था (SAA) गडचिरोलीचे संस्थापक श्री. पुरूषोत्तम चौधरी यांचे स्वपत्नीक महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटनेकडून विषेश सत्कार करण्यात आले. या संस्थेकडून नवजात बालकांचे संगोपन केल्या जाते आणि गरजू आई-वडिलांना त्या मुलांचे दत्तक प्रकियेद्वारे पालकत्व दिल्या जाते.
आकर्षक झाकी आणि रेला डान्स
या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण आदिवासींची संस्कृती झोपासणारा रेला डॉंस तसेच वाचकांनी वाचन संस्कृती जपावी अशी जनजागृती करणारी आकर्षक झाकी शहरवासीयांची लक्ष वेदून घेत होती.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More