महाराष्ट्राचा डबल धमाका; ट्रायथलॉनमध्ये दोन सुवर्ण
डेहराडून : गतविजेत्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मोहिमेला धडाक्यात सुरुवात केली असून, ट्रायथलॉनमध्ये सोमवारी महाराष्ट्राच्या डॉली पाटील आणि मिश्र रिले संघाने डबल सुवर्ण धमाका केला. कला.
हल्दवानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. महाराष्ट्राने मिश्र रिलेमध्ये सोनेरी यश मिळवले. यात खेळाडूंना २५० मी. पोहायचे, दहा किलोमीटर सायकलिंग करायचे आणि अडीच किलोमीटर धावायचे होते. या विजेत्या संघात पार्थ मिरगे, कौशिक मालंडकर, डॉली पाटील, मानसी मोहीते यांचा समावेश आहे. त्यांनी एकूण २ तास १२ मिनिटे व ०६ सेकंद वेळ नोंदवली. दरम्यान, मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी २ तास १२ मि. व ४१ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. महिलांत डॉली पाटीलने १
तास दहा मिनिटे आणि ०३ सेकंद वेळ नोंदवली आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. रौप्यपदकही महाराष्ट्राच्या मानसी मोहीतेनेच मिळवले. पुरुषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूरचे वर्चस्व दिसले. सरोंगबम अथौबा मैतेई याने सुवर्णपदक जिंकले, तर मणिपूरच्याच तेलहाईबा सोराम रौप्यपदक, तर महाराष्ट्राच्या पार्थ मिरगेने ब्राँझपदक मिळवले.
त्रिगुणित आनंद
महाराष्ट्राने रिलेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले, डॉलीचे सुवर्ण; तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुषांत पार्थने ब्राँझपदक मिळवले. या स्पर्धेतील ट्रायथलॉन पुरुषांत मिळवलेले हे महाराष्ट्राचे पहिलेच पदक ठरले. त्यामुळे हे यश आनंद त्रिगुणित करणारे ठरले, अशा भावना महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांनी व्यक्त केल्या.
कौशिक मालंडकर
कौशिक मालंडकर याचे प्राथमिक शिक्षण डी के टी प्राथमिक शाळेत झाले लहानपणी पासून पोहण्याची आवड असल्याने खेळाचे नवीन प्रकार ट्रीथॉलॉन मध्ये सराव सुरू केला हायस्कुल पुणे येथे बालेवाडी संकुलात पुतणे केला नंतर कॉलेज शिक्षण पूर्ण करत महाराष्ट्र च्या संघातून खेळला हरिद्वार येथे सुवर्ण पदक मिळवला.
कौशिक चे वडील विनायक मालंडकर नाट्यगृह चौकातील समीर जेम्स अँड ज्वेलर्स येथे कारागीर आहेत व आई भक्ती मालंडकर ग्रहणी आहेत.विनायक कौशिक मालंडकर याचे प्राथमिक शिक्षण डी के टी प्रथमिम शाळेत झाले लहानपणी पासून पोहण्याची आवड असल्याने खेळाचे नवीन प्रकार ट्रीथॉलॉन मध्ये सराव सुरू केला हायस्कुल पुणे येथे बालेवाडी संकुलात पुतणे केला नंतर कॉलेज शिक्षण पूर्ण करत महाराष्ट्र च्या संघातून खेळला हरिद्वार येथे सुवर्ण पदक मिळवला.
कौशिक चे वडील विनायक मालंडकर नाट्यगृह चौकातील समीर जेम्स अँड ज्वेलर्स येथे कारागीर आहेत व आई भक्ती मालंडकर ग्रहणी आहेत.विनायक मालंडकर यांचे मित्र समीर शेख,उद्योगपती कैश बागवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.सध्या महाराष्ट्र शासनाने कौशिक ची नेमणूक क्रीडा अधिकारी म्हणून नंदुरबार येथे केली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800