कन्या महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी
श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी, भोगावती महाविद्यालय कुरुकली, न्यू कॉलेज कोल्हापूर, व
शिवाजी विद्यापीठ कॉलेज लायब्ररीयन असोसिएशन
यांच्या संयुक्त विद्यमाने
एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. युजीसी रेग्युलेशन मसुदा २०२५ आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल
या विषयावर मुक्त चर्चा आणि तज्ञांचे मार्गदर्शन झाले.
ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील कार्यरत शैक्षणिक ग्रंथपाल, संशोधक, आणि विद्यार्थी यांना
श्री. मोहन खेरडे,माजी संचालक
ज्ञान स्त्रोत केंद्र,श्री संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती,
अध्यक्ष मुक्ला यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत यूजीसी नियमावली २०२५ चा मसुदा:शैक्षणिक संस्थांमधील ग्रंथपालांच्या व्यावसायिक भूमिकांवर, पात्रतेवर आणि संस्थात्मक योगदानावर होणारे बदल,ग्रंथपालांच्या पदनामात होणारे बदल,नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता (NET/SET किंवा पीएच.डी.),पदोन्नतीसाठी लागणारी पात्रता आणि कार्यप्रदर्शन निकष,शैक्षणिक कामगिरी निर्देशक (API) गुण, संशोधन योगदान, आणि इतर प्रगत निकष यावरती मार्गदर्शन केले.त्यानंतर मुक्त चर्चा झाली.
यासाठी डॉ. डी. ए. चौगले
प्राचार्य, भोगावती महाविद्यालय, कुरुकली, प्राचार्य डॉ. व्ही .एम. पाटील,न्यू कॉलेज, कोल्हापूर, प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे,श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीडॉ. आर. पी. आढाव, ग्रंथपाल, न्यू कॉलेज, कोल्हापूर, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ कॉलेज लायब्ररीयन असोसिएशन,श्री. प्रशांत कल्लोळी,
ग्रंथपाल, भोगावती महाविद्यालय, कुरुकली,श्रीमती मिनाज नाईकवडी, ग्रंथपाल,श्री. आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून २५५ जणांनी सहभाग नोंदवला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800