भगवान महावीर जयंती उत्सव मंडळातर्फे ११ ते १७ फेब्रुवारीला अँक्युप्रेशर सुजोक थेरपी शिबिर
इचलकरंजी
श्री १००८ भ.महावीर जयंती उत्सव मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने भ.महावीरांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक महोत्सवा निमीत्ताने अॅ क्युप्रेशर सुजोक थेरपी शिबीर इचलकरंजीमध्ये आयोजित केले आहे. हे शिबीर मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. या शिबीराची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ व सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत राहील. हे शिबीर वर्धमान सागर त्यागी भवन, डॉ.चिप्रे दवाखान्यामागे, जिम्नेशिअम मैदान शेजारी, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे आयोजित केले आहे.
डॉ.राम मनोहर लोहिया आरोग्य जिवन संस्था, जोधपूर, राजस्थान येथील अॅजक्युप्रेशर थेरपिस्ट या नैसर्गिक उपचार पद्धतीने मनक्याचे आजार, थायरॉईड, ब्लड प्रेशर, दमा, उपचन, सांधेदुखी, मानदुखी, चिकन गुणिया, पाठदुखी, लखवा, पोटरीमधील नस अडकणे, कंबरदुखी, लठ्ठपणा, झोप न लागणे, डोके दुखी, अतिसार, झोपेत लघवी होणे, सायटीका, कान-नाक-घसा यांचे आजर, हातातून मुंग्या येणे, पोटाचे विकार, मदुमेह व अॅेलर्जी या सर्व आजारांवर अॅंक्युप्रेशर सुजोन थेरपीद्वारे उपचार केले जाणार आहेत. या सशुल्क शिबीरामध्ये पहिले २५० रूग्णच घेतले जातील. प्रत्येक रूग्णास दररोज ३० मिनीटांचा अवधी लागेल. हे शिबीर ७ दिवस चालणार आहे. या शिबीराचे प्रायोजक स्व.श्री.बापूसो आण्णाप्पा जमदाडे यांचे स्मरणार्थ जमदाडे परिवाराच्या वतीने केलेले आहे.
या शिबीराच्या अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी अनिल बमन्नावर ९८५०६१९९१२, उदय चौगुले ९३२६००८२९९, भिमगोंडा पाटील ९३७०४९८८९४ व संजय मगदुम ९९२३०६११०८ यांचेशी संपर्क साधावा व गरजू रूग्णांनी या शिबीराच्या नैसर्गिक उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा असे आवाहन भ.महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800