वाचकांची गरज ओळखून ग्रंथालयांनी अद्ययावत उपक्रम राबवावेत-प्रकाश आवाडे
इचलकरंजी:
“तंत्रज्ञानाने आज ई बुक्सची सुविधा उपलब्ध झाली.वाचनाची पद्धत बदलत आहे.त्यामुळे वाचकांची गरज ओळखून ग्रंथालयाने अद्यावत उपक्रम राबवावेत.”असे प्रतिपादन माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित इचलकरंजीतील कोल्हापूर ग्रंथोत्सव सांगता समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.जिल्हा ग्रंथोत्सवासाठी सहकार्य केलेल्या आपटे वाचन मंदिरच्या अध्यक्षा सुषमा दातार,समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी,कल्लाप्पाण्णा आवाडे ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील,आनंदा काजवे,ग्रंथमित्र अरुणकुमार पिसे,संदीप कुंभार,विलास पाटील, अनिल पाटील,प्रा.युवराज मोहिते आदींचा सत्कार माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्याहस्ते करण्यात आला.
सकाळच्या पहिल्या सत्रात’मला भावलेले पुस्तक’या विषयावर गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी श्रेया चनगौंडार हिने ‘फिटे अंधाराचे जाळे’ गोविंदराव हायस्कूल चा विद्यार्थी आयुष चोरगे यांनी ‘अग्निपंख’, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी संकेत लाड यांनी ‘ओंजळीतला चाफा’,सरस्वती हायस्कूलचा विद्यार्थी उत्कर्ष शेंडगे यांनी ‘एक होता कार्व्हर’ इचलकरंजी हायस्कूलची विद्यार्थिनी कु.चिन्मयी उत्तुरकर हिने ‘इंगळीचा डंक’ रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे विद्यार्थी कृष्णा कनोजिया याने ‘तापमान वाढीचे मूळ’ आयुष उत्तुरे याने ‘जागर’ या पुस्तकांवर मनोगत व्यक्त केले.इचलकरंजी उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी मार्गदर्शन केले.माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.’मला भावलेले पुस्तक’ या विषयावर बोललेल्या विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट वाचक म्हणून काशिनाथ परमने,कुबेर सपकाळ,विलास पाटील,अलका महाजन,सुभाष सुतार,पुष्पा यादव,राजेंद्र घोडके,अजित शेडबाळे,वनिता देवगोंडा पाटील,नितीन दबडे यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. दुपारच्या सत्रात ‘डिजिटल युगातील वाचन संस्कृती व ग्रंथालयांची भूमिका’ या विषयावर सकाळचे संपादक निखिल पंडितराव म्हणाले,” डिजिटल युगातील वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी काळाची पाऊले ओळखून प्रयत्न केले पाहिजेत.”
प्रा.डॉ.रफिक सुरज यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले.कवयत्री नीलम माणगावे, प्रसाद कुलकर्णी,प्रा.रोहित शिंगे,सुवर्णा पवार,प्रा.रवींद्र पाटील,रघुनाथ कापसे,दिनकर खाडे,पाटलोबा पाटील,प्रा.डॉ.सुजित सौंदत्तीकर,राहुल राजापुरे, प्रा.मयू पाटील यांनी रसिक मनाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर केल्या.प्रसाद कुलकर्णी यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.ग्रंथोत्सवातील सर्व सत्रांचे सूत्रसंचालन प्रा.युवराज मोहिते यांनी केले.
जिल्हा ग्रंथोत्सवनिमित्त आयोजित १६ पुस्तकांच्या स्टॉलमधून सार्वजनिक ग्रंथालयांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथांची खरेदी केली.
फोटोओळ-
इचलकरंजी- येथील जिल्हा ग्रंथोत्सवात मार्गदर्शन करताना माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे शेजारी अपर्णा वाईकर,प्रसाद कुलकर्णी,सुषमा दातार,वृषाली पाटील

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800