सोमवारी १० फेब्रुवारीला १०८ संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय व गुरु मंदिर उद्घाटन समारोह तसेच गुरु प्रतिमा स्थापन समारंभ 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवारी १० फेब्रुवारीला १०८ संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय व गुरु मंदिर उद्घाटन समारोह तसेच गुरु प्रतिमा स्थापन समारंभ.

 

इचलकरंजी :
     परमपूज्य १०८ संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय व गुरु मंदिर उद्घाटन समारोह तसेच गुरु प्रतिमा स्थापन समारंभ येत्या सोमवारी(ता. 10) होत आहे. कोल्हापूर जयसिंगपूर रोडवरील माय स्कूल जवळ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या भागातील पहिलेच गुरु मंदिर यानिमित्ताने उभारले जात आहे.
    संत शिरोमणी समाधी सम्राट  १०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराजजी यांच्या पहिल्या समाधी स्मृती महामहोत्सवानिमित्त  श्री विद्यासागरजी महाराजजी यांची ६५० किलो वजनाची पंचधातू मूर्ती गुरुमंदिरात उभारण्यात येणार आहे. आचार्यश्रींच्या ‘धम्म दया शुद्धो’ या संकल्पनेतून प्रेरित होऊन सर्व अनुव्रती व महाव्रतींच्या आरोग्यरक्षणासाठी  दक्षिण भारतात पहिले भव्य “आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक रुग्णालय” उभारण्यात येत आहे.आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा  आचार्य श्री सन्मतीसागर महाराज (दक्षिण) यांचे परमशिष्य संयम मूर्ती प.पू. १०८ आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज ससंघ,प.पू.  १०८ मुनिश्री विशालसागरजी महाराजजी यांचे आशीर्वाद आणि मंगल सानिध्यात तसेच  108 आचार्य श्री चंद्रप्रभसागर महाराज  यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू आहे.
आचार्य श्री चंद्रप्रभसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  धर्मनगर चिपरीलगत भव्य असे वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले आहे. त्यानंतर या लगतच आता अडीच   एकर जागेमध्ये वेगवेगळे संकुल साकारत आहेत. धार्मिक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत वेगवेगळ्या सुविधा या निमित्ताने साकारत आहेत. यानिमित्ताने येत्या सोमवारी भव्य आणि दिव्य असे कार्यक्रम होत आहेत
      या  कार्यक्रमास प. पू. १०८ आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज ससंघ,प. पू. १०८ आचार्य श्री चंद्रप्रभसागरजी महाराज ससंघ,प. पू. निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ धर्मसागरजी महाराज,  मुनिश्री १०८ विद्यासागरजी महाराज,श्री १०८ सिध्दांतसागरजी महाराज, १०८ मुनिश्री विशालसागरजी महाराज १०८ मुनिश्री धवलसागरजी महाराज,१०८ मुनिश्री उत्कृष्टसागरजी महाराज,१०८ मुनिश्री विदेहसागरजी महाराज तसेच स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, नांदणी स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, कोल्हापूर स्वस्तिश्री चारुकिर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, श्रवणबेळगोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यनिमित्ताने सकाळी मंगल निनाद, अभिषेक पूजन
व सकाळी  8 वाजता ध्वजारोहण  अशोकजी पाटणी (किशनगढ) यांच्या हस्ते होईल.
दुपारी 1वाजता संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालयउद्घाटन  अशोकजी पाटणी परिवार त्यानंतर “मल्ली समयमती” त्यागी आहार भवन उद्घाटन अनिल शेटी(बेंगलोर) पंकज जैन, दिल्ली यांच्या हस्ते होईल.”मुनिश्री अक्षयसागरजी महाराज संत निवास चे उदघाटन  प्रभात जैन, मुंबई व  “विनित-चंद्रप्रभ मुनि पंचकर्म कक्ष”चे
उद्घाटन व “विमल आर्यिका पंचकर्म कक्षचे
उद्घाटन   प्रकाश बडजात्या(चेन्नई), अतुल शहा (बारामती) यांच्या हस्ते होईल.दुपारी पावणे दोन वाजता संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज गुरुमंदिर उद्घाटन समारंभास सुरुवात होईल.संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज पंचधातू प्रतिमा संस्कार कल्पना व  सतिश पारीसा होरे (वाळवा) यांच्या उपस्थितीत होईल. तर गुरुमंदिरचे उदघाटन आमदार डॉ.  राजेंद्र व संजय शामगोंडा पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते होईल.मुनिश्री १०८ अक्षयसागरजी महाराज त्यागी भवन च्या 3 खोल्यांचे उदघाटन श्रीमती माधुरी राजेंद्र डुडू (नातेपुते) यांच्या हस्ते तर मल्ली समयमती त्यागी आहार भवनचे उदघाटन विद्यासमय युवा जागृती पावन वर्षायोग समिती सदस्य यांच्या उपस्थितीत होईल.
या संपूर्ण कार्यक्रमास अशोक पाटणी (किसन गड राजस्थान), प्रभात जैन (मुंबई) अनिल शेट्टी (बेंगलोर) पंकज जैन (दिल्ली) अतुल शहा (बारामती) प्रकाश बडजात्या (चेन्नई) यांची तसेच खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ,आमदार राहुल आवाडे, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटकचे आमदार अभय पाटील, संजय पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील, जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यासन्मतीदार सेवा संस्था, विद्यासन्मतीदास सेवा समिती, चंदाबाबा सेवा प्रतिष्ठान व पंचकल्यानिक प्रतिष्ठा महामहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More