पंचगंगा नदीपात्रात बांधाऱ्यासाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनदरबारी-आ.राहुल आवाडे यांचा पाठपुरावा.
इचलकरंजी:
आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून येथील पंचगंगा नदीपात्रातील बंधार्याच्या दुरुस्तीसह बंधार्याची उंची वाढविण्यासंदर्भात 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे बंधार्यात पाणी अडविण्यासाठी होत असलेले अडथळे दूर होणार असून इचलकरंजीसाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
इचलकरंजी शहरालगतच असलेल्या पंचगंगा नदीतून शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाते. उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात कोल्हापूर पध्दतीचा एक बंधाराही बांधण्यात आलेला आहे. परंतु या बंधार्याची आता दूरवस्था होत चालली असून शिरदवाड बाजूस बंधार्याला भगदाड पडल्याने त्यातून पाणी वाहून जात आहे. परिणामी बंधार्यात पाणी साठा होत नसल्याने नदीकाठावरील गावातील पाणी योजना आणि शेतकर्यांना पाण्याअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या बंधार्याच्या दुरुस्तीसह बंधार्याची उंची वाढविण्याची मागणी होत होती. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी पंचगंगा नदीतील बंधार्याबाबतच्या परिस्थितीची माहिती दिली. या बंधार्यामुळे इचलकरंजीसह नदीकाठावरील अनेक गावांना पाणी पुरवठा योजनाच्या माध्यमातून पाणी मिळते. त्याचबरोबर शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. मात्र प्रदीर्घकाळापासून या बंधार्याची दुरुस्तीच झाली नसून तो कालबाह्य होऊन दूरवस्था होत चालली आहे. बंधार्याच्या एका बाजूला भगदाड पडले असून पाणी अडविण्यासाठी असलले दरवाजे/लाकडी बरगे खराब झाल्याने बंधार्यात पाणीसाठा होत नाही. त्यामुळे इचलकरंजीह ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना बंद पडून पाणीटंचाई जाणवते. त्यासाठी या बंधार्याची दुरुस्ती व उंची वाढविण्यसाठी ५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. उंची वाढल्याने पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सदरचा प्रस्ताव संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे संबंधितांना आदेश दिले आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800