विज्ञान शिक्षणाच्या नवीन वाटा – रोटरी क्लब इचलकरंजी आणि विद्योदय मुक्तांगण यांच्या विद्यमाने विज्ञान शिक्षक कार्यशाळा उत्साहात संपन्न.
इचलकरंजी :
रोटरी क्लब इचलकरंजी आणि विद्योदय मुक्तांगण परिवार, अब्दुल लाट यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान शिक्षकांसाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब, इचलकरंजी येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत जेष्ठ विज्ञान शिक्षक व संशोधक श्री. रवींद्र गोडबोले (M.E, IISc Bangalore) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष संतोष पाटील व सचिव चंद्रकांत मगदूम] विनायक गद्रे] विनया गद्रे] गजानन वैद्य या मान्यवराच्या उपस्थितीत इचलकरंजी परिसरातील विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक श्री. रवींद्र गोडबोले यांनी विज्ञान शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतींना नवीन प्रयोगशील दृष्टिकोनाने कसे समृद्ध करता येईल] यावर भर दिला. त्यांनी विज्ञान शिक्षणात केवळ पाठांतर न करता, प्रत्यक्ष प्रयोग आणि अनुभवाधारित अध्यापनाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी स्पीकरच्या ध्वनीनिर्मिती प्रक्रिया, चुंबकीय क्षेत्र व विद्युत प्रेरणा] इलेक्ट्रोमॅग्नेटचे कार्य आणि विद्युत ऊर्जा निर्मिती यावर आधारित विविध प्रयोगांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
“पर्यावरणातील बदलांबाबत मुलांना प्रयोगाच्या माध्यमातून शिकवणे किती प्रभावी ठरते, हे या कार्यशाळेत समजले. विज्ञान शिकवताना प्रयोग हा अनिवार्य भाग असायला हवा,” असे एका शिक्षकांनी सांगितले.
या कार्यशाळेमुळे शिक्षकांना नवीन प्रयोग आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली असून, ते आपल्या शाळांमध्ये प्रयोगात्मक अध्यापनाची अंमलबजावणी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब इचलकरंजी, विद्योदय मुक्तांगण परिवार आणि संयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनायक माळी व सूत्रसंचालन रेश्मा मोहिते यांनी केले तर आभार ज्योती कांबळे मानले.
फोटो- इचलकरंजी: विज्ञान कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील ,श्री रविंद्र गोडबोले ,गजानन वैद्य ,विनायक गद्रे ,विनायक माळी,

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800