कृष्णा योजनेस गळती,इचलकरंजीला पाणीटंचाई कायम
इचलकरंजी
इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडी कडून येणारी जूनी पाण्याच्या दाबनलिकेस मजरेवाडी जॅकवेल जवळ पाईपलाईला गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहरास होत असलेला पाणी पुरवठा आज तातडीने बंद करणेत आलेला आहे.
सदर ठिकाणची गळती काढणेचे काम महानगर पालिकेच्या वतीने तातडीने हाती घेणेत आल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार असल्याने शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. याबद्दल महानगर पालिका प्रशासन दिलगीर आहे.सदर पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल.
तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणी साठा जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.
आयुक्तांचे गळतीने स्वागत-
नुतन आयुक्त पल्लवी पाटील यांना कार्यभार स्वीकारल्यानंतर गळतीने सलामी दिली असुन इचलकरंजी पाणीपुरवठा उन्हाळ्यात कसा सुरळीत ठेवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे..

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800