युवा स्पंदन गायन स्पर्धेत श्रवणीय सादरीकरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

युवा स्पंदन गायन स्पर्धेत श्रवणीय सादरीकरण

इचलकरंजी:
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय, राज्यस्तरीय ‘युवा स्पंदन’ या स्पर्धा उपक्रमाच्या पहिल्या दिवशी भावधारा – गीत गायन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि बहुतेक सर्व स्पर्धकांनी श्रवणीय अशी गाणी सादर केली.
या स्पर्धेत वासिम मुजावर (न्यू कॉलेज कोल्हापूर) याने प्रथम क्रमांक मिळवला तर नितेश साठे (डी. आर. माने महाविद्यालय कागल) याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक शिवम कुरुंदवाडकर (चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली) याने तर उत्तेजनार्थ पुरस्कार अश्विनी पोतदार (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) व प्रज्ञा बेलवलकर (जीए कॉलेज ऑफ सायन्स सांगली) यांनी मिळविले.
सदरच्या स्पर्धेचे उदघाटन येथील गायक आणि वकील बाबासाहेब निकम यांच्या आणि परीक्षकांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी निकम यांनी उदघाटनपर गीत सादर केले. स्पर्धेचे परीक्षक या नात्याने सौ. रंजना माने कोल्हापूर, गणेश कुलकर्णी जयसिंगपूर आणि मिलिंद कांबळे इचलकरंजी यांनी उत्तमपणे जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मर्दा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील व सेक्रेटरी नागेश दिवटे, मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे तसेच स्पर्धा उपक्रमाचे मार्गदर्शक प्रा. प्रशांत कांबळे यांच्या आणि परीक्षकांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेच्या सुरुवातीला गोवंडे यांनी स्वागत केले तर प्रा. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मर्दा आणि पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले तर सर्व परीक्षकांनी स्पर्धकांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. परीक्षकांचा परिचय आणि उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित ढवळे यांनी केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन मानसी कुलकर्णी, निखिल शिंदे व संजीवनी कदम यांनी केले. स्पर्धेचे व्यवस्थापन सचिन चौधरी व कपिल पिसे यांनी केले. ध्वनी व्यवस्था होगाडे जॉबर यांची होती. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या या स्पर्धेसाठी इचलकरंजी व परिसरातील रसिक श्रोते उपस्थित होते.

युवा स्पंदन, भावधारा – गीत गायन स्पर्धेतील विजेते स्पर्धक आणि परीक्षक व पदाधिकारी. 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More