मजुरीवाढीसंदर्भात ट्रेडिंग कंपनी असोसिएशन व यंत्रमागधारक संघटनांची बैठक घ्यावी.-पॉवरलूम असोसिएशन
इचलकरंजी :
मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांना ट्रेडिंग कंपनी असोसिएशन व यंत्रमागधारक संघटना यांची मजूरी वाढीसंदर्भात बैठक घेणेबाबतचे निवेदन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्यावतीने देणेत आले.
सदर निवेदनात यंत्रमाग कामगारांच्या मजूरीवाढीस सर्व यंत्रमागधारक संघटनांचा विरोध असतानाही मा.सहाय्यक कामगार आयुक्तांनी एकतर्फी मजूरीवाढ जाहीर केलेली आहे. याचा आम्ही निषेध करीत आहोत. खरेतर सन २०१६ पासून यंत्रमागधारक संघटना या करारातून बाहेर पडल्या आहोत. आणि तसे पत्र वेळोवेळी दिलेली आहेत.
सन २०१३ पासून ट्रेडिंग कंपनी चालक कोणतीही मजूरीवाढ देणेस तयार नाहीत. किंवा ते चर्चेलाही येत नाहीत. प्रशासन फक्त एकतर्फी कामगारांची बाजू घेऊन मजूरीत वाढ करते. परंतू मजूरीने बिमे आणून कापड विणणाऱ्या कारखानदारांची बाजू प्रशासन घेत नाही व ऐकूणही घेत नाही. त्यामुळे जरी दरवर्षी मजूरीवाढ जाहीर झाली, तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ट्रेडिंग कंपनी चालकांकडून यंत्रमागधारकांना मजूरी वाढवून मिळत नसलेने यंत्रमागधारकांना कामगारांना मजूरी वाढवून देता येत नाही.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रत फक्त इचलकरंजीमध्येच अशी कामगारांच्या मजूरीवाढीची घोषणा होते. इचलकरंजीपेक्षा मोठ्या केंद्रामध्ये उदा. भिवंडी, मालेगांव इ. येथे कामगारांची मजूरीत वाढ होत नाही. त्यामुळे इचलकरंजीतील उत्पादन खर्च वाढलेला आहे. यामुळे इचलकरंजीत उत्पादित होणाऱ्या कापडास मागणी येत नाही. यामुळे गावामध्ये मंदीचे वातावरण तयार होते यास सर्वस्वी मा.सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार आहात. कारण आपण एकतर्फी मजूरी वाढ जाहीर करता. या मजूरी वाढीच्या घेषणेमुळे कारखाना पातळीवर वाद विवाद घडत आहेत. यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत आहे.
त्यमुळे ट्रेडिंग कंपनी चालक असोसिएनशन व यंत्रमागधारक संघटना यांची मजूरी वाढीसंदर्भात बैठक घडवून आणणेची जबाबदारी मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांची आहे. त्यांनी ती बैठक लवकरात लवकर घ्यावी. अन्यथा यंत्रमागधारक संघटना पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील. यामुळे शहरातील शांतता बिघडलेस अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस यास मा.सहाय्यक कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील असे निवेदनात नमुद केलेची माहिती दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिलेली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800