मुंबईचा शशांक वाकडे हा हिराज श्री पुरस्काराचा मानकरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईचा शशांक वाकडे हा हिराज श्री पुरस्काराचा मानकरी

इचलकरंजी:

येथील महापालिकेच्या विठ्ठलरामजी शिंदे शाळेच्या मैदानावर आकर्षक विद्युत रोषणाईसह भव्य स्टेजवर अत्यंत उत्साही वातावरणात झालेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबईचा शशांक वाकडे हा हिराज श्री पुरस्काराचा मानकरी ठरला. तर विश्‍वनाथ बकाली(सांगली) हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो., न्यु कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग असो. यांच्या मान्यतेने विविध ९ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र आणि सीमाभागातील २५० हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. माजी आमदार प्रकाश आवाडे, सेलीब्रिटी ट्रेनर मनिष अडवीलकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री हनुमानाच्या मुर्ती पुजन करून या स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी धनंजय माने, दिपक माने, बाळासाहेब माने, राजु बोंद्रे, प्रकाश मोरबाळे, सतीष मुळीक उपस्थित होते. स्पर्धाकांनी संगीताच्या तालावर आपली पिळदार शरीरयष्टी सादर केली. यामध्ये ५५ किलो वजनी गटात अवधुत निगडे (कोल्हापूर), ६० किलो वजनी गटात नितेश कोळेकर (ठाणे), ६५ किलो वजनी गटात नितीन म्हात्रे (ठाणे), ७० किलो वजनी गटात पंचकिशरा लोणार (सोलापूर), ७५ किलो वजनी गटात सिमाभागातील प्रताप कलकुंद्रीकर, ८० किलो वजनी गटातराहुल क्षेत्रे (ठाणे), ८५ किलो वजनी गटात विश्‍वनाथ बकाली (सांगली) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर झालेल्या खुल्या गटात मुंबईचा शशांक वाकडे हा हिराज श्री चा मानकरी ठरला तर मेन्स फिजीक्स स्पर्धेत युवराज जाधव (कोल्हापुर) याने प्रथम क्रमांक पटकावला. अ‍ॅड. सचिन माने, डॉ. प्रशांत मदने, सुजय शेळके, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो. चे सचिव राजेंद्र चव्हाण, शरद मारणे, राजेश वडाम, प्रभाकर कदम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिराज श्रीचा मानकरी शशांक वाकडे, उपविजेता विश्‍वनाथ बकाली, मोस्ट इंप्रुव्हड बॉडी बिल्डर नितेश कोठेकर, बेस्ट म्युझिक पोझर निलेश वाडेकर यांना पुरस्कार देण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी आमदार राहुल आवाडे, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, प.पू. हेरवाडकर मामा (संत बाळुमामा मंदिराचे विश्‍वस्त) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ५० अधिकृत पंच उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवशाही फौंडेशन, हिराज हेल्थ अ‍ॅण्ड फिटनेस सेंटरच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धा पाहण्यासाठी युवा वर्गासह शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेदरम्यान आकर्षक आतषबाजी केली जात असल्याने उपस्थितांचा उत्साह द्विगुणीत होत होता.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More