खा.माने,मा.नगरसेवक रणजित पाटील यांच्या प्रयत्नातून रुग्णास बिलात सवलत.
हातकणंगले:
खासदार धैर्यशीलदादा माने यांच्या माध्यमातून व मा नगरसेवक रणजीत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने आनंदराव दिनकर जाधव रा हातकणंगले यांच्या कुटुंबीयांचे हॉस्पिटलचे बिल तब्बल २३,२००/- रुपयांनी कमी करुन आणले
हातकणंगले येथील आनंदराव दिनकर जाधव यांच्या लहान मुलगीला निमोनिया व फुफुसामध्ये पाणी झाल्याने उपचारासाठी डाॅ. बडे हॉस्पिटल, जवाहरनगर, इचलकरंजी येथे १५ दिवसापासून ऍडमिट केले होते.
सर्वसामान्य जाधव कुटुंबियांना उपचाराचा येणारा खर्च परवडणारा नव्हता. त्यानंतर आनंदराव जाधव यांनी मा नगरसेवक रणजीत पाटील यांची भेट घेऊन उपचाराविषयी सविस्तर कल्पना दिली तसेच १५ दिवसाच्या हॉस्पिटल बिलात व मेडिकलच्या बिल कमी करण्याची विनंती केली.
नगरसेवक रणजीत पाटील यांनी तातडीने खासदार धैर्यशीलदादा माने यांना पेशंटच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली व हॉस्पिटलला संपर्क साधून बिलात कपात करण्याची विनंती केली.
त्यानंतर तातडीने खासदार धैर्यशीलदादा माने ऑफिस व मा नगरसेवक रणजीत पाटील यांनी डॉ बडे हॉस्पिटल प्रशासनाशी सततचा पाठपुरावा सुरू केला. शेवटी हॉस्पिटल प्रशासनाने लहान मुलगीच्या डिस्चार्ज घेतेवेळी हॉस्पिटल फायनल बिलामध्ये १८,५००/- रू व मेडिकल फायनल बिलामध्ये ४७००/- रू असे एकूण तब्बल २३,२००/- रू कमी केले आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800