इचलकरंजी महानगरपालिकेकडून बंदी असलेले सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात बंदी असलेले सिंगल युज प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरणेत येत असल्याचे निदर्शनास येत असल्याने संबंधितांवर कारवाई करणेचे निर्देश आयुक्त पल्लवी पाटील यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना दिले होते. या निर्देशानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना महानगर पालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाच्या क्षेत्रातील स्वच्छता निरीक्षक यांना बंदी असलेले सिंगल युज प्लॅस्टिक वापरणारे व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते,फळ विक्रेते यांचेवर दंडात्मक कारवाई करणेचे आदेश दिले आहेत.
या अनुषंगाने शहरातील
एक्सपर्ट एंटरप्रायजेस, धनाजी डोईफोडे, राजु बागवान आणि किरण डाके या व्यावसायिकांवर कारवाई करणेत आली आणि त्यांचेकडून १२ किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकुण ८०००/- इतका दंड वसूल केला आहे.
या मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक संदीप मधाळे, करण लाखे,प्र. स्वच्छता निरीक्षक कविता सोळंकी, मुकादम शामराव जावळे आदी सहभागी झाले होते.
महानगरपालिका प्रशासना कडून बंदी असलेले सिंगल युज प्लॅस्टिक विरोधी मोहीम यापुढे कायम पुणे सुरू राहणार असल्याने शहरातील व्यापारी, दुकानदार,फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच इतर लहान मोठे व्यावसायिक यांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करु नये तसेच नागरिकांनी सुद्धा प्लॅस्टिक पिशव्यांचा आग्रह न धरता कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800