महानगरपालिकेच्या ऑनलाईन सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा-आयुक्त पल्लवी पाटील
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी विविध सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणेत आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ॲसेंटिक कंपनीमार्फत कर विभागाशी संबंधित पुरविणेत येत असलेली सेवेचा समावेश आहे.
या अनुषंगाने आज मंगळवार दि.४ मार्च रोजी आयुक्त पल्लवी पाटील यांनी एच.डि.एफ.सी. बॅंकेचे आणि ॲसेंटिक कंपनीचे प्रतिनिधी, लेखा आणि कर विभागाचे अधिकारी यांचे समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत कर तसेच मिळकत विभागाच्या ऑनलाईन सेवेशी संबंधित कर / गाळा भाडे भरणा याबाबत विविध प्रकारच्या अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेने ॲसेंटिक कंपनीचे प्रतिनिधी सोबत याबाबत सविस्तर चर्चा करून नागरिकांना ऑनलाईन सेवेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येवु नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे च्या सुचना संबंधित कंपनी प्रतिनिधींना दिल्या. तसेच शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडून पुरविण्यात येत असलेल्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेवून आपला वेळ वाचवावा असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले.
या बैठकीस एच.डी.एफ.सी. बॅंकेचे शाखा व्यवस्थापक संदीप मडके, क्लस्टर हेड सचिन राजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे,कर संकलन अधिकारी अरिफा नुलकर, फॅसिलिटी मॅनेजर संतोष पवार, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, कर अधिकारी स्वप्निल बुचडे, सहा लेखापाल, किरण मगदूम, रोखपाल संदीप कांबळे यांचेसह ॲसेंटिक कंपनीचे प्रतिनिधी भरत साळुंखे, प्रणव शिंदे आदी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800