आधार संस्थेतर्फे पुरस्कारांची घोषणा; बुधवारी वितरण
इचलकरंजी:
सामाजिक कार्यात सातत्याने अग्रभागी राहणार्या येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना ‘आधार गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून बुधवार 26 मार्च रोजी दुपारी 5 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न होत आहे, अशी माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर, बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतिफ गैबान, आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर यांनी दिली. दरम्यान, रमजान ईद निमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीने याचदिवशी (26 मार्च) गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी संस्थेच्यावतीने बापूसो गौसनबीसो ढालाईत (सामाजिक क्षेत्र), अॅड. इरफान एम. जमादार (न्याय क्षेत्र), डॉ. मारुफ युसूफ हिरोली (वैद्यकिय क्षेत्र), शहानूर वहाब कमालशहा (शैक्षणिक क्षेत्र) आणि राजू सरदार नदाफ (कला क्षेत्र) यांची ‘आधार गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर बद्रेआलम मिरासाब देसाई यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय चंदूर येथील कु. राबिया महंमद मकुभाई (शैक्षणिक) हिला विशेेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण व खीर मसाला साहित्य वाटप समारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, उद्योजक मन्सुर मुजावर, सुरेशदादा पाटील, बिल्डर्स असो.इचलकरंजी अध्यक्ष फैयाज गैबान आदी मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी आधार संस्था उपाध्यक्ष हारुण पानारी, महिला मंडळ अध्यक्षा सौ. साजिदाबानू मुजावर, माजी नगरसेविका सौ. बिलकिस मुजावर, युसूफ तासगांवे, फरीद मुजावर, फारुक आत्तार, रफिक मुल्ला, सलीम ढालाईत, जकीअहमद, फरहान मुजावर, मौलाना अब्दुलरज्जाक सावनुर, ग्रंथपाल रिजवाना गैबान आदी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800