कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रिकेचे उद्घाटन संपन्न.
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने एका विशेष भित्तीपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय अर्थतज्ञ या विषयावरील विद्यार्थिनींच्याकडून भित्तिपत्रिका तयार करून घेण्यात आल्या होत्या.
या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे यांच्या हस्ते व अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रो.डॉ. त्रिशला कदम यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी प्रा.संभाजी निकम,प्रा.वारंग व प्रा. गिरीश झुरळे तसेच बी ए भाग ३ अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थीनींना महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,दादाभाई नौरोजी,गोपाळ कृष्ण गोखले, अमर्त्य सेन इ.भारतीय अर्थशास्त्रज्ञांची जीवनविषयक माहिती व्हावी तसेच त्यांचे अर्थशास्त्रातील योगदान याविषयी माहिती व्हावी या उद्देशाने भित्ती पत्रिकेचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये कु. पल्लवी जनवाडे हिने उपस्थितांचे स्वागत केले.कु. प्रियांका भोसले हिने प्रस्ताविक केले तर कु. तेजश्री कुडाळकर हिने उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते,प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800