उपमुख्यमंत्री ना.अजित दादा इचलकरंजीच्या सुळकुड योजनेला न्याय देतील-शशांक बावचकर
इचलकरंजी
आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार शहरात येत आहेत. याच दौऱ्यात ते इचलकरंजी महानगरपालिकेला भेट देऊन महानगरपालिकेच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले.महानगरपालिकाही त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहे
या भेटीदरम्यान शासनाकडे असणारा जीएसटी परतावा, घनकचरा व्यवस्थापन तसेच अन्य काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तथापि इचलकरंजी शहराचा २०१२ पासून प्रलंबित असलेल्या प्राणी प्रश्नावर चर्चा होणे आवश्यक आहे. तत्कालीन युती सरकारच्या काळात मंजूर असलेली वारणा योजनेला विरोध होतोय हे लक्षात आल्यानंतर १८ जून २०२० रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनीच ‘सुळकुड’ योजनेला मान्यता दिलेली होती.तथापि याही योजनेला कोणतेही सबळ कारण नसताना,दूधगंगा धरणामध्ये पिण्याचे पाणी शिल्लक असताना, मूळ योजनेमध्ये साठपासाठी लागणाऱ्या १४० एकर जमिनीच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झालेला नसताना आता मात्र ही योजना होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर नवनवीन मुद्दे उपस्थित केले जात आहेत याचे प्रत्यंतर नुकतेच माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत दिसून आले.या सर्व प्रश्नांवर इचलकरंजीची लोकप्रतिनिधी ही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी पर्यायी योजनेवर चर्चा करण्यावर भर देत आहेत.
वस्तुतः सुळकुड पाणीपुरवठा योजना ही एक व्यवहार्य योजना असून यामध्ये कोणाचेही नुकसान होणार नाही हे स्पष्ट आहे. माननीय नामदार अजितदादा पवार एक कार्यक्षम मंत्री व लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी आजवर त्यांच्या कारकीर्दीत अनेक योजनांद्वारे एका ठिकाणचे पाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे मुळात इचलकरंजी साठी सुळकुड योजना मंजूर करणारे माननीय अजितदादा हा प्रश्न समजून घेऊन सोडऊ शकतात व ठामपणे ही योजना पुढे यशस्वीपणे रेटण्याचे काम करू शकतात.
सबब माननीय अजित दादांनी इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नांमध्ये लक्ष घालून मंजूर असलेल या पूर्णत्वास न्यावी व काही दिवसापूर्वी या योजनेला माननीय मुख्यमंत्री यांची उपस्थितीत पूर्णविराम देण्याच्या पयत्नाला छेद देण्यात यावा असे बावचकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.
सुळकुड मंजुरी इचलकरंजीला पाणी देऊ नसल्याची अजितदादांची खंत.
-महाविकास आघाडी सरकार असताना सुळकुड योजनेस मंजूरी मिळाली,तत्कालीन सरकार मध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा बैठकीस उपस्थित होते,त्यावेळी ४ लाख लोकसंख्या असणाऱ्या इचलकरंजी शहरास आपण पाणी देऊ शकत नाही हि लाजिरवाणी बाब असल्याचे त्यांनी म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली होती,त्यामुळे त्यांनी मंजूर केलेल्या योजनेस न्याय द्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800