इचलकरंजी महानगरपालिकेची वाटचाल जीएसटी अनुदानावरच.८१६ कोटींचा अर्थसंकल्प सादर,२२ कोटी ५५ लाख शिलकी अंदाजपत्रक.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेची वाटचाल जीएसटी अनुदानावरच.८१६ कोटींचा अर्थसंकल्प सादर,२२ कोटी ५५ लाख शिलकी अंदाजपत्रक.

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेचा  ८१६.२० कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सन २०२५-२६ साठी आज प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी सादर केला. महापालिका सार्वत्रिक निवडणुका झाल्या नसल्याने स्थायी समिती व महासभा अस्तित्वात नसून प्रशासकांच्या अधिकारानुसार हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
या अर्थसंकल्पात कोणत्याही करवाढीचा प्रस्ताव नाही.महापालिकेचे मुख्य उत्पन्न स्रोत मालमत्ता कर असून, त्यातून योग्य नियोजन करत १२% वाढ अपेक्षित आहे. एकूण महसुली जमा रु. २२९.४८ कोटी तर महसुली खर्च रु. ३०४.८५ कोटी आहे. तसेच भांडवली जमा रु. ४७०.९३ कोटी व भांडवली खर्च रु. ४८८.८० कोटी असा अंदाज आहे.
संविधानिक योजना: दिव्यांग, महिला व बालकल्याण साठी प्रत्येकी ३५ लाख तर आर्थिक दुर्बल घटक आणि क्रीडा योजनेसाठी प्रत्येकी रु. २५ लाख रु तरतूद करण्यात आली आहे.
PM E-Bus योजनेसाठी रु. १२.०२ कोटी तरतूद; २५ इलेक्ट्रिक बस मंजूर; सोलगे मळा येथे चार्जिंगसह बस डेपो विकसित करण्याचे काम सुरू असून ऑगस्ट पर्यत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागासाठी ४७ कोटींची तरतूद करण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन,स्वच्छ महाराष्ट्र अभियान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, औषध फवारणी आदींचा समावेश आहे.
बांधकाम विभागासाठी १४७.५२ कोटींची तरतूद करण्यात आली असून रस्ते पॅचवर्क, गटार व्यवस्था, चौक सुशोभिकरण, नगरोत्थान महाअभियानाचा समावेश आहे.
पाणीपुरवठा विभागासाठी २९३.०३ कोटींची तरतूद; भूमिगत गटार योजना, मजरेवाडी व पंचगंगा जॅकवेल दुरुस्ती.व सुळकुड योजनेच्या स्वहिश्श्याची रक्कम याचा समावेश आहे.
विद्युत विभागा साठी १८.१२ कोटींची तरतूद; सीएसआर मधून ८१KW क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागासाठी  रु.१६.५१ कोटींची तरतूद केली असून ३३ शाळांना शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण,शिक्षकांचे वेतनाचा समावेश आहे.
ई-गव्हर्नन्स: रु. २.०३ कोटींची तरतूद; ई-ऑफिस प्रणाली एप्रिल महिन्यात सुरु करून १ मे पर्यत १००% कार्यान्वित करणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.
 आगामी निवडणुकांसाठी रु. ४.१० कोटींची तरतूद.सरळसेवा भरती: रु. १ कोटींची तरतूद; ८० सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती.
मालमत्ता कर सवलत: वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांना १०, ४, ३, २% सवलत. देण्यात येईल
GST चा १०७७ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे व शासनाकडे रु. ३२७ कोटी सहायक अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. यावरच महापालिकेची मदार आहे.
या अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी प्रशासक अमोल येडगे, आयुक्त पल्लवी पाटील, सहायक आयुक्त रोशनी गोडे, लेखाधिकारी विकास खोळपे, नगरसचिव विजय राजापूरे उपस्थित होते.
चौकट
महापलिकेची मदार जीएसटी परतावा व सहायक अनुदानावरच.
इचलकरंजी महापालिका होऊन ३ वर्षे होत आहेत पुढील २ वर्षात सहायक अनुदान बंद होईल अशा परिस्थितीत स्वतःचे उत्पन्न वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने कोणतीही नविन योजना करण्यात आली नाही.मालमत्ता करातील नियोजन करून साधारण १२ टक्के वाढ अपेक्षित धरली असली तरी जीएसटी परतावा १०७७ कोटी आणि सहायक अनुदान ३२७ कोटी यावर महापालिकेची भिस्त आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणीसुद्धा त्यातून भागवली जाणार असून या दोन्ही अनुदानास गती मिळाली तरच महापलिका चालेल अन्यथा महापलिकेस लवकरच स्वतःचे उत्पन्न स्रोत निर्माण करावे लागणार आहेत.
फोटो- अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी प्रशासक अमोल येडगे, आयुक्त पल्लवी पाटील, सहायक आयुक्त रोशनी गोडे, लेखाधिकारी विकास खोळपे, नगरसचिव विजय राजापूरे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More