अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तरूण व महिला उद्योजकांना केंद्र सरकारने भरीव मदत द्यावी,मंत्री चिराग पास्वान यांच्याकडे युवा नेते परवेज गैबान यांची मागणी.
नवी दिल्ली-
इचलकरंजी कृषी पुरक आणि कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणा-या उद्योगांसाठी विशेष सुविधा दिल्या जाव्यात. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात वाढ करताना बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन दिले जावे,अशी मागणी युवा नेते परवेज लतीफ गैबान यांनी केंद्रिय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पास्वान यांच्याकडे नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटीदरम्यान केली.
केंद्रिय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांच्याशी परवेज गैबान यांनी सुमारे दीड तास सविस्तर चर्चा केली. खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली परवेज गैबान यांनी नाम. पास्वान यांची भेट घेऊन अनेक मागण्यांवर चर्चा केली. त्यावर नाम. पास्वान यांनी गैबान यांच्याशी बोलताना सकारात्मक भूमीका स्पष्ट केली
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शिवाय महाराष्ट्रात कृषी पुरक उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. देशाची आणि विशेषतः महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज’ च्या माध्यमातून महिला आणि तरुणांना सक्षम करता येते. त्यासाठी विशेष सहकार्य केले जावे, अशी अपेक्षा युवा नेते परवेज गैबान यांनी नाम. चिराग पास्वान यांच्याकडे व्यक्त केली. ते म्हणाले, फळ भाजी प्रक्रिया करून त्याची विक्री करण्यासाठी खास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. फळ आणि भाजी प्रक्रिया केल्यानंतर त्याची निर्यात करण्यासाठी उद्योजक तरुणांना केंद्रिय फूड प्रोसेस इंडस्ट्रीज मंत्रालयातर्फे भरघोस सहकार्य मिळायला हवे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणान्या ज्वारी, नाचणी, मशरूम, मसाले, मका या अन्न घटकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला भरारी घेण्यासाठी तरूण आणि महिला वर्गाना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी आवशक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. धान्य आणि कडधान्य याद्वारे असंख्य खाद्यपदार्थ बनवले जातात. पण या अन्न प्रक्रिया उद्योगात केंद्रिय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयाने विशेष लक्ष केंद्रित केल्यास प्रामुख्याने महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. अशी सविस्तर भूमीका युवा नेते परवेज गैबान यांनी मंत्री
चिराग पास्वान यांच्याशी बोलताना स्पष्ट केली.त्यावर ना. चिराग पास्वान म्हणाले, केद्रिय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील शेतकरी, शेती उद्योजक,तरुण उद्योजक,महिला आदीं साठी एक प्रशिक्षण प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
यातून पात्र लाभार्थी उद्योजकांना वित्तीय सहकार्य केले जाणार असल्याची ग्वाही नाम. चिराग पास्वान यांनी युवा नेते परवेज लतीफ गैबान यांना दिली
दरम्यान, परवेज गैबान यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगात महिला व तरुणांना मोठी मदत मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
फोटो-
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याशी चर्चा करताना परवेज गैबान
अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत ना.चिराग पासवान यांची दिल्ली येथे परवेज गैबान यांनी भेट घेतली त्यावेळी उपस्थित खा.धैर्यशील माने.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800