जिद्दीने पोलिस उपनिरिक्षक बनलेल्या संजय रायमाने याचा सत्कार
इचलकरंजी –
जिद्द, चिकाटी आणि ध्येय याच्या बळावर येथील साईट नं. १०२ मधील युवक संजय मोहन रायमाने याने पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी आमदार आवाडे यांनी यावेळी दिली.
साईट नं. 102 या कामगार वस्तीत राहणार्या संजय रायमाने याने पोलिस दलात जाण्याची जिद्द उरी बाळगली होती. त्याच्या लहानपणीच वडील देवाघरी गेल्यानंतर मोलमजुरी करुन आई शालन रायमाने यांनी संजय याला पाठबळ दिले. त्यामध्ये संजय याची आजी-आजोबा यांचीही मोलाची साथ लाभली. संजय याने आईसह आजी-आजोबा यांची साथ आणि चिकाटीच्या बळावर उराशी बाळगलेले ध्येय गाठत कष्टाचे चीज केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करुन त्याने थेट पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी घातली.
या यशाबद्दल त्याचा आमदार राहुल आवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांनीही संजय याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आरोग्य सभापती संजय केंगार, मिंटु सुरवशे, सखुबाई कुराडे, तुळशीदास चव्हाण, बापू घुले, भिमराव पाथरवट, एकनाथ पारसे, उत्तम गुळगे, संदीप भडंगे, सचिन भडंगे, परशुराम वंजिरे, गणेश भंडारे, जिनेबादशहा मुतवल्ली, शंकर कांबळे, राजू होगाडे, बिरु हेगडे, राहुल भडंगे, समाधान नेटके, बव्रुवान विभुते, रामा पाटील, किशोर भागवत आदी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800