कोळी महासंघ राज्य कार्यकारिणी सदस्यपदी बाळासाहेब माने
इचलकरंजी –
कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य कार्यकारीणी सदस्यपदी कोळी समाजातील युवा नेतृत्व बाळासाहेब वाल्मिक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
बाळासाहेब माने हे सातत्याने समाजकार्यात नेहमीच अग‘ेसर असतात. समाजाचे विविध प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आमदार रमेशदादा पाटील यांनी त्यांच्यावर कोळी महासंघाची जबाबदारी सोपविली होती. माने यांनी यापूर्वी महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहेत. या काळात त्यांनी समाज संघटना मजबूत करण्यासह युवकांना एकजुट करुन त्यांना मार्गदर्शन व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजाप्रती त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार रमेशदादा पाटील यांनी बाळासाहेब माने यांची कोळी महासंघाच्या राज्य कार्यकारीणीत सामावून घेतले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून याकामी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मुंबई येथे महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस ठपके, भाजपा महाराष्ट्र राज्य मच्छिमार सेल अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब माने यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800