दि मर्चंट्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध, चेअरमनपदी दिलीप मुथा, व्हाईस चेअरमनपदी अभिजित पटवा यांची फेरनिवड
इचलकरंजी:
दि मर्चंट्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. इचलकरंजी या पतसंस्थेची २०२५-२०३० सालची निवडणूक बिनविरोध पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी जमादार यांच्या अध्यक्षतेखाली व श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ इचलकरंजीचे अध्यक्ष श्री रमेश जैन व निवर्तमान अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया यांच्या उपस्थितीत नुतन संचालक मंडळाची बैठक पार पडली.यामध्ये चेअरमन पदासाठी श्री.दिलीप अमृतलाल मुथा यांचे नाव दिलीप चंगेडिया यांनी सुचवले व दीपक गांधी यांनी त्यास अनुमोदन दिले.व्हाईस चेअरमन पदासाठी अभिजित राजेंद्र पटवा यांचे नाव ज्येष्ठ संचालक राजेंद्र बंब यांनी सुचवले तर योगेश भळगट यांनी अनुमोदन दिले.
संस्थेच्या चेअरमनपदी श्री दिलीप मुथा,व्हाईस चेअरमनपदी अभिजित पटवा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी नुतन संचालक सौ संगीता पगारिया, सौ आशा भंडारी,दगडू माने व माजी व्हाईस चेअरमन शेखर पगारिया उपस्थित होते.
फोटो-
चेअरमन दिलीप मुथा व व्हाईस चेअरमन अभिजीत पटवा यांचा सत्कार करताना रमेश जैन,श्रीकांत चंगेडिया व राजेंद्र बंब व पदाधिकारी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800