प्रबोधिनीत शनिवारी मुशायरा व जाहीर व्याख्यान
इचलकरंजी:
मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा ९३ वा जन्मदिन आणि ‘ गझलसाद ‘संस्थेचा आठवा वर्धापनदिन या निमित्ताने समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि गझलसाद (कोल्हापूर )यांच्या संयुक्त विद्यमाने मुशायरा व जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. ज्येष्ठ गझलकार व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. भीमराव धुळूबुळू(मिरज )हे ‘ सुरेश भट आणि मराठी गझल ‘ या विषयावर बोलणार आहेत. तसेच यावेळी होणाऱ्या मुशायऱ्यामध्ये डॉ.दिलीप कुलकर्णी,श्रीराम पचिंद्रे, भीमराव धुळूबुळू, नरहर कुलकर्णी, हेमंत डांगे, डॉ.दयानंद काळे,सारिका पाटील यांच्यासह अनेक मान्यवर गझलकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार ता. १२ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५ वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे. तरी या कार्यक्रमास साहित्य काव्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रबोधन वाचनालय व गझलसादच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800