कबनुर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात
कबनुर
कबनुर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेच लकी ड्रॉ पद्धतीने कुपन रथातून भगवंताना बसण्याचा मान सुजन भाऊसो शिरुगुप्पे यांना मिळाला. कार्यक्रमात एकूण ७ घोड्याचा पण ड्रा काढण्यात आला.महिलांचा या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
९ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत नवकार महामंत्र जापाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी या भक्तिमय वातावरणात मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.
१० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता भाऊसाहेब सावंता केटकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.सकाळी ८ वाजता भव्य पालखी मिरवणुकीचे मुख्य मार्गावरून आयोजन करण्यात आले,त्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
वाचनालयाचे उद्घाटन संजय जिवंधर कोले यांच्या हस्ते पार पडले.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
या प्रसंगी तीर्थंकर माता सवाल प्रमिला पाटील तर पुजन सवाल अनिकेत अशोक केटकाळे यांनी घेतला.
कार्यक्रमात समाजासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या पाठशाळेतील शिक्षक मनोहर हेरवाडे यांचा ‘त्याग मानपत्र’ देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान मान्यवर मनोहर मणेरे, संजय कोले,सुधाकर मणेरे, सुधीर लिगाडे,राजू शिरगुप्पे,सौरभ लिगाडे विशाल जनाज, अरिहंत हेरवाडे, सचिन हेरवाडे सुशांत मल्लिवाडे आणि प्रशांत केटकाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोहर हेरवाडे यांचा सत्कार करताना मान्यवर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800