ई बाईक टॅक्सीची परवानगी रद्द करा-रिक्षाचालकांचे आ.राहुल आवाडेना निवेदन
इचलकरंजी
वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त रिक्षाचालक नव्या नियम आणि अटींमुळे मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना पूर्ववत कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यात प्रवासी भाडे करण्याचा परवाना देण्यात यावा. त्याचबरोबर राज्य शासनाने इ-बाईक टॅक्सीला (इलेक्ट्रिक दुचाकी) प्रवासी भाडे करण्यासाठी दिलेली परवानगी राज्यभरातील रिक्षाचालकांवर अन्याय करणारी असल्याने इ बाईक टॅक्सीची परवानगी तातडीने रद्द करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेच्यावतीने आमदार राहुल आवाडे यांना देण्यात आले.
निवेदनात, यापूर्वी रिक्षा चालकांना कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात प्रवासी भाडे घेऊन जाण्याचा परमिट परवाना होता. परंतु काही वर्षापासून तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे इचलकरंजीमध्येच प्रवासी भाडे करण्याचा परमिट परवाना असून तो रिक्षा चालकांवर अन्याय करणार आहे. त्यातच घरोघरी दुचाकी व चारचाकी वाहनांची सं‘या वाढल्याने त्याचाही परिणाम रिक्षा व्यवसायावर होत आहे. रिक्षा चालकाला शहर सोडून तिन्ही जिल्ह्यात भाडे घेऊन गेल्याचे आढळून आल्यास मोठ्या दंडाला सामोरे जावे लागते. शिवाय दरवर्षी वाढत जाणारा विमा, पासिंगचा खर्च, वाढती महागाई, स्पेअरपार्टचे वाढत्या दरामुळे रिक्षा चालकांना जगणे मुश्किलीचे बनत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्याचा परमिट परवाना पूर्ववत सुरु करण्याबाबत आपण प्रयत्न करावेत.
त्याचबरोबर राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत इ-बाईक टॅक्सीला प्रवासी भाडे करण्याची दिलेली परवानगी महाराष्ट्रातील रिक्षा चालकांवर अन्याय करणारी आहे. या निर्णयाचा रिक्षा व्यवसायावर परिणाम होणार आहे. इ-बाईक टॅक्सीला परवानगीमुळे नागरिक कमी भाड्यात प्रवास करणार. परिणामी सिंगल प्रवाशी भाडे करण्यापासूनही मुकावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने इ-बाईक टॅक्सीला दिलेली परवानगीतातडीने रद्द करण्याबाबतही आपण प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नाईलाजस्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकाराव लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या शिष्टमंडळात रामचंद्र जाधव, शिवाजी साळुंखे, अल्ताफ शेख, कय्युम जमादार, रामचंद्र कचरे, रुपचंद पोळ, सुनिल नाकार्डे, अशोक नांद्रे यांच्यासह रिक्षचालकांचा समावेश होता.

आ.राहुल आवाडेना निवेदन देताना रिक्षाचालक

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800