डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी:
डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील बी.टेक व डिप्लोमा विभागात शिक्षण घेणा-या सहा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत क्रिहान टेक्स मेक प्रा. लि. (रिड अँण्ड टेलर), कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. रिड अँण्ड टेलर कंपनी ही डीकेटीई संस्थेमध्ये गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूव मार्फत निवड करीत आहे.
क्रिहान टेक्स मेक प्रा. लि. (रिड अँण्ड टेलर) ही वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून कॉटन शर्टींग, व वर्स्टेड शुटींग मधील दर्जेदार फॅब्रिक बनविणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातील वस्त्रोद्योग निर्मितीतील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्हयुव आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्हयू अशा फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेवून त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली. रिड ऍण्ड टेलर कंपनीमध्ये राज शिंदे, श्रेयश मांनगावे, निखिल लवटे, ॠषिकेश नाझरे, सम्मेद पाटील व एम के श्रीमान या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हयूव मध्ये होत असतो.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईतून क्रिहान टेक्स मेक प्रा. लि. (रिड अँण्ड टेलर) कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800