ना.बा.विद्यामंदिरात आंतरशालेय स्पर्धाचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न.
इचलकरंजी
ना. बा. बालमंदिर व विद्यामंदिरमध्ये येथे गोविंदराव हायस्कूलच्या “शतकोत्तर रौप्यमहोत्सव निमित्त आयोजित केलेल्या आंतरशालेय स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ” संपन्न झाला. श्री.ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्री. श्रीनिवासजी बोहरा शेठजी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहूणे संस्थेचे चेअरमन मा. श्री कृष्णाजी बोहरा, संस्थेचे ट्रेझरर मा.श्री.महेशजी बांदवलकर, संस्थेचे विश्वस्त श्री. अहमद मुजावर, स्कुल कमिटी चेअरमन श्री.श्रीकांतजी चंगेडिया तसेच गोविंदराव हायस्कुलचे मुख्याध्यापक तेली सर, उपमुख्याध्यापक कोरे सर, पर्यवेक्षक पिष्टे सर,एमसिव्हीसी विभागप्रमुख पाटील सर, अध्यापक मोहीते सर, कोळी सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजनाने समारंभाला सुरूवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. शारदा भगत यांनी केले. पाहूण्यांचा परिचय सी. जी. एस. पोवार यांनी केला. मान्यवरांचा सत्कार माननीय पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगतात विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच श्री. मोहीते सर यांनी आपल्या मनोगतातून आपल्या शाळेच्या स्थापनेपासूनचा इतिहास व प्रशाला यशोगाथा मुलांना सांगितली .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. निशा दंडगे यांनी केले. यादीवाचन श्री. आनंद कांबळे यांनी व उपस्थितांचे आभार प्रदर्शन सौ. जयश्री पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास, सौ. पोवार , सौ. साळुंखे, सौ. गायकवाड, सौ. डावरे, सौ. सटाले, श्री. कारंडे, श्री. गावित, श्री. महाजन, श्री. जाडर, श्री. चव्हाण या शिक्षकांचे तसेच सौ चिंचवाडे, श्रीमती कोरे, सौ कुंभार, सौ पांगीरे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800