अहिल्यादेवींच्या विचारांची आजही समाजाला गरज : डॉ. विनीता तेलंग
इचलकरंजी/प्रतिनिधी –
तिनशे वर्षापुर्वीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची आजही समाजाला नितांत गरज आहे. त्यांच्या विचारातील न्यायव्यवस्था, कर व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, शेती तसेच निसर्ग आणि पर्यावरण व्यवस्था याची अंमलबजावणी केली तर आदर्श व बलवान राष्ट्रनिर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात लेखिका व व्याख्यात्या तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. सौ. विनिता तेलंग यांनी केले.
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आणी डी के टी ई सोसायटी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त राष्ट्रनिर्मात्या अहिल्यादेवी होळकर या विषयावर यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज सभागृह येथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्या काळात सर्वार्थाने शिक्षित व निस्सीम शिवभक्त असणाऱ्या अहिल्यादेवी यांनी आपल्या संकल्पनेतुन भारतीय पराभूत मानसिकतेतून पुरुषार्थ जागृत केला असेही त्यांनी सांगितले…
प्रारंभी राज्य बॅंक फेडरेशन च्या उपाध्यक्षा व सहकार भारती प्रदेश महिला प्रमुख सौ. वैशाली आवाडे यांनी सहकार भारतीच्या देशपातळीवर सुरु असणाऱ्या कार्याची तपशीलवार माहिती दिली. सहकार भारती जिल्हा महामंत्री श्रीकांत चौगुले यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास डी के टी च्या प्राचार्या डॉ. ललिता आडमुठे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, वायसीपीचे प्राचार्य ए पी कोथळी, सहकार भारती पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले, कोल्हापूर विभाग सहसंघटक जवाहर छाबडा, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अरविंद मजलेकर, संघटक सागर हुपरे, सहसंघटक संजय सातपुते, प्रा. कानिटकर, हजर होते.
सुत्रसंचालन संजय सातपुते यांनी केले. मनोगत व आभारप्रदर्शन जवाहर छाबडा यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
फोटो कॅप्शन-कार्यक्रमात दीपप्रज्वलन प्रसंगी उजवीकडुन सौ. वैशालीताई आवाडे, डॉ. सौ. विनीता तेलंग, अरविंद मजलेकर, सागर चौगुले, जवाहर छाबडा, श्रीकांत चौगुले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800