पेहलगाम येथील भ्याड हाल्याचा भाजपा अल्पसंख्याक आघाडी वतीने जाहीर निषेध
इचलकरंजी ता.
जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम या ठिकाणी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करून दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवादांच्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीच्या इचलकरंजी जाहीर निषेध करण्यात आला.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चां अध्यक्ष अलीहुसेन खान यांच्या नेतृत्वाखाली मा.गांधी पुतळा चौक, इचलकरंजी येथे पहेलगाम या ठिकाणी निष्पाप पर्यटकांवर, नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार निष्पाप लोकांचा बळी घेतला. यावेळी हाल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी भारतमाता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानचा धिक्कार असो, आशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेतच त्यांना सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली.
यावेळी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आकाशा मुल्ला, जिल्हाध्यक्ष तैयब कुरेशी, औरंग शेख, अनिस म्हालदार, सलीम शिकलगार, बांदार बाबा, इम्रान बागवान, फारुख बागेवाडी, फिरोज बांगी, पांडुरंग म्हातुगडे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, शशिकांत मोहिते, अहमद मुजावर, अॅड.भरत जोशी, अमित जावळे, आसिफ काझी, रसूलभाई सय्यद, अमीर मुल्ला, फैयाज नदाफ, महिला अध्यक्ष सौ.अश्विनी कुबडगे, अल्पसंख्याक मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा शेख, नजमा शेख, सौ. निता भोसले, सौ. अमिता बिरंजे, सौ. माधवी मुंढे, नागुबाई लोंढे, सौ. रंजना डावरे, सौ. ज्योती लाटणे, हैदर खान, जयकुमार काडाप्पा, अमर कांबळे, भगवान बरगाले, दिलावर लाटकर, सोहेल खान, सुनील स्वामी, प्रदीप माळगे, नितीन पडियार, उमाकांत दाभोळे, राहुल गागडे, भानुदास तासगावे, प्रवीण केरेणवार, हर्षवर्धन गोरे, विजय पवळे, सौ. योगिता दाभोळे, महेश निगवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने निषेध करताना भाजप पदाधिकारी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800