पहलगाम हल्ल्यातील मृतांत्म्याना बार असोसिएशन तर्फे श्रद्धांजली
इचलकरंजी –
पहलगाम, काश्मिर येथील निष्पाप भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधिशसो मा. मंदार नेरलेकरसो, सर्व न्यायाधिशसो, न्यायालयीन कर्मचारी व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व वकिल सदस्य यांचे उपस्थितीत न्यायालयाच्या प्रांगणामध्ये श्रद्धांजली वाहणेत आली.
याप्रसंगी मा. जिल्हा न्यायाधिशसो श्री. मंदार नेरलेकरसोो, मा. वरिष्ठ दिवाणी न्यायालय मा. श्री. बी.टी. येंगडे, मा.श्री. जी.एम. नदाफ व मा. श्री. पी.एम. रोकडे, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसोा श्री. डॉ. डी. जी. पटवेसोो, मा. एम.एम. चौधरीसोो, मा. एस.डी. वानखेडेसा, मा. एम.एस. गावडेसो व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. श्री. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. श्री. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. श्री. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. श्री. अदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. श्री. महेश कांबळे, अॅड. श्री. राहुल काटकर, अॅड. श्री. शैलेंद्र रजपूत व सर्व वकिल सदस्य उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800