ICHMH51NEWS.IN
9921600800

विविध हायस्कूलमधील इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विविध हायस्कूलमधील इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

इचलकरंजी –
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल पुरस्कृत शहर व परिसरातील विविध हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इंटरॅक्ट क्लबचा २०२५-२६ या नूतन वर्षाचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. रोटरी प्रांत ३१७०च्या डिस्ट्रिक्ट इंटरॅक्ट सेक्रेटरी सौ. गौरी शिरगावकर, कोल्हापूर ह्या पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना त्यांनी “इंटरॅक्टच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सेवाभावी कार्य करताना निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजनबद्ध काम करावे. या माध्यमातून सामाजिक काम केल्याने तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ते उपयुक्त ठरेल त्याचबरोबर समाजासाठीही ते हिताचे होईल.‌” अशा आशयाचे उदगार काढले.
यावेळी सहाय्यक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी आणि इंटरॅक्ट आरडीसी नितीन शेट्टी पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी इंटरॅक्टची माहिती सांगितली त्याचबरोबर “इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसीत होतील तसेच त्यातून उद्याच्या भारतासाठी आदर्श नागरिक आणि चांगले नेतृत्व निर्माण होऊ शकेल.” अशा प्रकारचे विचार व्यक्त केले.
सदरच्या कार्यक्रमात  शहरातील इचलकरंजी हायस्कूल, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, दि न्यू हायस्कूल, भारती हायस्कूल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, ज्ञानबातात्या दत्तवाडे हायस्कूल, रा. छ. शाहू हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल तसेच कबनूर हायस्कूल कबनूर या सर्व हायस्कूलमधील इंटरॅक्ट क्लबचे नूतन अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना पाहुण्यांच्या हस्ते तसेच मावळते अध्यक्ष व सेक्रेटरी यांचेकडून पदभार सोपवण्यात आला. याप्रसंगी विविध हायस्कूलच्या पदाधिकारी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Advt
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी यांनी प्रास्ताविक केले तर स्वागतपर मनोगत इंटरॅक्ट संचालक नितीन शहा यांनी केले.  पाहुण्यांची ओळख सेक्रेटरी प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी करून दिली. शेवटी आभार प्रदर्शन तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय होगाडे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमास रोटरी सदस्य, इंटरॅक्ट सदस्य आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंटरॅक्ट क्लबज् पदग्रहण समारंभ प्रसंगी नूतन पदाधिकारी विद्यार्थी आणि पाहुणे व संयोजक… 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा