स्कॉलरशिप व एम.टी.एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचा भरघोस यश “सतत परिश्रम हिच यशाची गुरुकिल्ली” — कृष्णा बोहरा
इचलकरंजी:
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल च्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी २०२४-२५ च्या शिष्यवृत्ती व महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एम.टी.एस.) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. एकूण चार विद्यार्थिनींनी एम.टी.एस. परीक्षेत तर तीन विद्यार्थिनींनी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले.
या गुणवंत विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ शाळेत उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन कृष्णा बोहरा यांनी यशस्वी विद्यार्थिनी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे विशेष अभिनंदन करत “सतत परिश्रमच यशाचे मुख्य साधन आहेत,” असे सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका ए.एस. काजी मॅडम यांनी स्वागत व प्रास्ताविकात शाळेच्या यशाचा आढावा घेत गुणवंत विद्यार्थिनींच्या मेहनतीचे, पालकांच्या सहकार्याचे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले.
कु. संस्कृती संतोष आबाळे हिने स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात १०वी, तर एम.टी.एस. परीक्षेत राज्यात ४थ्या क्रमांकावर येण्याचा मान पटकावला. तसेच कु. ईशा विनायक कांबळे हिला स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यात ४१वी व एम.टी.एस.मध्ये राज्यात १२वा क्रमांक मिळाला. कु. गार्गी पोवार जिल्हा गुणवत्ता यादीत ५८वी, तर कु. जान्हवी कुरुंदवाडे हिला विशेष बक्षीस प्राप्त झाले.
या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे ट्रेझरर महेश बांदवलकर, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर, ऑन. सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे, विश्वस्त अहमद मुजावर, उपप्राचार्य व्ही.जी. पंतोजी, पर्यवेक्षिका सौ. व्ही.एस. लोटके, एस.एस. कोळी, मार्गदर्शक शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. संस्कृती व तिचे वडील संतोष आबाळे यांनी यशाबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख सौ. आर.एस. रॉड्रीग्युस यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. व्ही.एस. लोटके यांनी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांसोबत चेअरमन कृष्णा बोहरा व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







