इचलकरंजीत कर्जाच्या वादातून हल्ला; गुन्हा दाखल
इचलकरंजी
इचलकरंजीत स्टेशन रोडवरील एमएसईबी बिल्डिंगच्या तळघरात 30 जुलै रोजी सकाळी कर्जाच्या वादातून झालेल्या भांडणात सचिन दाते याने एका तरुणावर कटरने हल्ला केला. पैशाच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि कटरने डाव्या हातावर, पाठीवर व खांद्यावर वार करून जखमी केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार आबीटकर करीत असून पुढील कारवाई सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







