शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल
इचलकरंजी
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत अरबाज मिरजकर यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इचलकरंजी येथील सोडगे मळा, मॉडर्न हायस्कूलजवळ याठिकाणी जानेवारी २०२५ ते २३ जुलै ,२२०५ या कालावधीत घडली. आरोपी अरबाज उर्फ अरमान जावेद मिरजकर (वय १९, रा. शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याने अल्पवयीन पीडित मुलीशी मैत्री करून तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिला बाहेर भेटण्यास भाग पाडले. पीडितेचे आई-वडील कामावर गेले असताना घरी येऊन आक्षेपार्ह फोटो मोबाईलवर काढले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. याशिवाय, आरोपीने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, आरोपीने वारंवार पीडितेचा पाठलाग करून तिची छेड काढली आणि लज्जास्पद कृत्ये केली.
पीडित मुलीने आपल्या आईसमोर हा प्रकार उघड केल्यानंतर तिच्या फिर्यादी जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पो.स.इ. जाधव करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







