भाजपा इचलकरंजी पूर्व, पश्चिम व ग्रामीण मंडल कार्यकारिणी जाहीर.
इचलकरंजी :
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण मंडलांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते आणि ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
या कार्यकारिणीत महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध आघाड्या तसेच सेलप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पदे देण्याचा भाजपाचा नियम असून, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा करून ही यादी निश्चित करण्यात आली.
पूर्व मंडल मध्ये महिला मोर्चा अध्यक्ष सीमा कमते, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन पोवार, ओबीसी मोर्चा सगीर मुला, एससी मोर्चा बापू गेजगे, अल्पसंख्यांक मोर्चा फारुक बागेवाडी, आयटी सेल स्वागत नानावटी, सोशल मिडीया सेल सिद्धार्थ पुजारी, शिक्षक आघाडी विशाल देसाई.
पश्चिम मंडल मध्ये महिला मोर्चा अध्यक्ष सपना भिसे, युवा मोर्चा प्रमोद बचाटे, ओबीसी आघाडी संजय हणबर, किसान मोर्चा ज्ञानेश्वर कोळी, कामगार आघाडी संदीप मांगलेकर, व्यापारी आघाडी कमलकिशोर तिवारी, आयटी सेल सिद्धलिंग बुक्का, सोशल मिडीया प्रमुख माधव उपाध्याय, क्रीडा आघाडी तात्या कुंभोजे
ग्रामीण मंडलात महिला मोर्चा पुनम भोसले, युवा मोर्चा अमर खोत, किसान मोर्चा राजू शिरगुप्पे, अल्पसंख्यांक मोर्चा समीर जमादार, सोशल मिडीया अध्यक्ष मनोज अधव, शिक्षक आघाडी रणजित माने, सहकार आघाडी सचिन चौगुले, अनुसूचित जाती मोर्चा विजय कांबळे, डॉक्टर सेल वैभव शिंदे यांची निवड झालेली आहे
या घोषणेवेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अमृत भोसले, मनोज हिंगमिरे, राजु भाकरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







