सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ नियोजनाच्या अनुषंगाने शहरातील सर्व शासकीय यंत्रणांचे समवेत पुर्वतयारी बैठक संपन्न.
इचलकरंजी
दि.२७ ऑगस्ट २०२५ पासुन गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने इचलकरंजी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन शहरवासीयांना अत्यंत आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी महापालिका, पोलिस, महसूल प्रशासन यासह इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकारी यांचे समवेत संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अति.आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली होती.
सदर बैठकीत आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी येणारा गणेशोत्सव शहरातील सर्व नागरिकांना मंगलमय आणि आनंदी वातावरणात साजरा करणेत यावा यासाठी शहरातील सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी योग्य पद्धतीने समन्वय साधून काम करावे असे आवाहन केले.
या अनुषंगाने शहरातील गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्ती तातडीने करणेचे तसेच श्रीगणेश मूर्तींना अडथळा निर्माण होत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणेचे आदेश संबंधित विभाग प्रमुख यांना दिले. तसेच गणेशोस्तवाच्या अनुषंगाने आवश्यक कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करणेच्या सूचना सर्व विभाग प्रमुख यांना दिल्या.
यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून करणेत आलेल्या सूचनांचे अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यांनी संबंधित विभाग प्रमुख यांना दिले
त्याचबरोबर आगमन आणि विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळा निर्माण होत असलेल्या विद्युत तारांची उंची आवश्यकते नुसार वाढविण्यासाठी एम.एस.ई.
बी. प्रतिनीधी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचेशी समन्वयक साधून कार्यवाही करणेच्या सुचना दिल्या.
गणेशोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक देखावे तसेच गणेश मूर्ती पाहण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असते त्यामुळे शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणेच्या सुचना दिल्या.
या बैठकीसाठी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, तहसीलदार महेश खिललारी, सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता वैभव गोदिल, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे, शाखा अभियंता प्रसाद अवघडे, सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहा. आयुक्त विजय राजापुरे, विद्युत अभियंता इसरार बेग, एन.यु.एच.एम.च्या डॉ.प्राची ढाले, परिवहन महामंडळाचे सागर पाटील, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, माहिती भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, मंडल अधिकारी राजेंद्र बावणे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, विजय पाटील, आदी अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव बैठकीदरम्यान आयोजित बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील व इतर प्राधिकरण पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







