ICHMH51NEWS.IN
9921600800

सुमेध पेंडुरकर यांना टेक्सास ए-अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये पीएचडी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुमेध पेंडुरकर यांना टेक्सास ए-अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये पीएचडी

इचलकरंजी :
येथील चि. सुमेध दत्तगुरु पेंडुरकर यांना अमेरिकेतील टेक्सास ए-अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयात वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.
सुमेध यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डी.के.टी.ई. इंग्लिश मीडियम स्कूल, इचलकरंजी येथे झाले. दहावीमध्ये असतानाच त्यांनी एनटीएस (National Talent Search) शिष्यवृत्ती मिळवली होती. तसेच ते राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झाले होते.
पुढील शिक्षणासाठी त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) मध्ये प्रवेश घेतला. याच काळात COEP चा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला, त्या प्रकल्पात सुमेध यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता.
सुमेध पेंडुरकर यांच्या या यशामुळे इचलकरंजी शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Coep उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला त्यावेळी पंतप्रधान मोदींनी कौतुक केले तो क्षण
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा