काँग्रेसकडून वोट चोरीविरोधात मशाल आंदोलन
इचलकरंजी : इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वोट चोरीच्या विरोधात गांधी पुतळा येथे सायंकाळी मशाल आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात वोट चोरीचे पुराव्यानिशी गंभीर आरोप केले होते. दुबार मतदार, एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे, तर काही मतदारांची विविध राज्यांत नावे असल्याने चार चार ठिकाणी मतदान झाल्याचे प्रकार त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभर आंदोलन सुरू असून बिहारमधील पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी मनोगतात सांगितले.
इचलकरंजीतील आंदोलनादरम्यान “वोट चोर गद्दी छोड”, तसेच निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र घोषणा देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, किशोर जोशी, शेखर पाटील, रवी पाटील, अजित मिणेकर, सचिन साठे, सोहेल बाणदार, तौसिफ लाटकर, राजु काटकर, रवी वासुदेव, रविराज पाटील, प्रमोद नेते, स्टीफन आवळे, ताजुद्दीन खतीब, आण्णा कांबळे, साजिद मकानदार, सुदाम साळुंखे, अक्षय कांबळे, योगेश कांबळे, शिवा चव्हाण, रियाज चिकोडे, अल्ताफ मुजावर, विशाल पोवार, युवराज कांबळे, प्रशांत खांडेकर, राहुल कांबळे, पोपट शिंदे, चंद्रकांत आवळे, प्रशांत भिवरे, हबीब मुजावर, पवन शिंदे, आशिष वाकडे, सलिम शेख, बिस्मिल्ला गैबान, वेदीका कळंत्रे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वोट चोरी प्रकरणी मशाल आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







