खुनाच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना ४ तासात अटक शहापूर पोलिसांनी केली जलद कारवाई
शहापूर (ता.२९ ऑगस्ट) :
तारदाळ येथील श्री बालासा उद्योग समूहाच्या समोर घडलेल्या खुनाच्या प्रकरणातील तिघा आरोपींना शहापूर पोलिसांनी केवळ ४ तासांत अटक केली आहे. संतोष गोपाळ पांडा (वय ३८, मुळ रा. ओडिशा, सध्या शहापूर) याचा लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून करण्यात आला होता.
फिर्यादी वसंत सावळेराम शेजवळ यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गुरुवारी रात्री ८.१५ वाजता घडला.
आरोपी मनोज चंद्रमणी बेहरा (वय २४), तपस नरोत्तम बेहरा (वय २२) व सिबाराम जंबेश्वर बेहरा (वय २२, सर्व मुळ रा. ओडिशा, सध्या रा. तारदाळ) हे संतोष पांडा याच्यासोबतच कारखान्यात काम करीत होते. मयताने आरोपी तपस बेहरा याची तसेच इतर काही कामगारांची कारखाना व्यवस्थापनाकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने संतोष पांडा याच्यावर हल्ला केला. लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा जागीच मृत्यू झाला.दाखल अंमलदार पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







