इचलकरंजीत गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी पोलीस दल सज्ज
इचलकरंजी : शहरात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज झाले आहे. आज दुपारी मराठा मंडळ हॉल, इचलकरंजी येथे मा. अप्पर पोलीस अधीक्षक (गड विभाग) श्री. अण्णासाहेब जाधव यांनी बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांना मार्गदर्शन केले.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर, इचलकरंजी, शहापूर तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
बंदोबस्तासाठी २५ पोलीस अधिकारी, २०० पोलीस अंमलदार, २५० होमगार्ड यांच्यासह आरसीपी पथक व एसआरपी प्लाटून तैनात करण्यात आले आहेत. विसर्जनावेळी सर्वांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







