नृत्य कार्यक्रमाने इचलकरंजी फेस्टिव्हलची सांगता
लहानांपासून ते मोठ्या गटापर्यंत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सादर केलेल्या नृत्याच्या अदाकारीने उपस्थितांची चांगलीच वाहवा लुटली. धमाकेदार नृत्ये आणि त्याला मिळालेला प्रतिसाद अशा संगमात इचलकरंजी फेस्टिव्हल 2025 ची सांगता झाली. स्पर्धेतील विजेत्यांसह गौरी सजावट आणि घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेतील विजेत्यांना आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
सकाळच्या सत्रात झालेल्या डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेचा शुभारंभ शिक्षक दिनाचे औचित्य साधत शहर व परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिका यांच्या हस्ते श्रींची महाआरती करुन करण्यात आले. यावेळी संजय लोटे, अशोक हुबळे, सौ. अलका शेलार, राजेंद्र घोडके आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होता. प्रास्ताविक फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी तर स्वागत सेक्रेटरी शेखर शहा यांनी केले.
सर्वच गटातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपली अदाकारी नृत्याच्या माध्यमातून सादर केली. सर्वच स्पर्धकांमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. प्रत्येक नृत्याला प्रोत्साहन दिले जात होते. शालेय व महाविद्यालयीन डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेत लहान गटात जिझस इंग्लिश मिडीयम, व्यंकटराव हायस्कुल व डीकेटीई राजवाडा हायस्कुल या संघांनी तर मोठ्या गटात एकलव्य इंग्लिश मिडीयम, डीकेटीई नारायणमळा व डीकेटीई राजवाडा या संघांनी यश प्राप्त केले. महाविद्यालयीन गटात डीकेटीई इंजिनिअरींग कॉलेज, डीकेटीई ज्युनिअर कॉलेज व दि न्यू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज यांनी यश मिळविले. परिक्षक म्हणून सायली चोथे व निलम कोळेकर यांनी काम पाहिले. याप्रसंगी गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सुर्यवंशी, सपना भिसे, सीमा कमते, अर्चना कुडचे, नजमा शेख आदी उपस्थित होते.
दरम्यान, इचलकरंजी मर्यादीत घरगुती गणेशोत्सव आरास (डेकोरेशन) स्पर्धेत रमेश पाटील (प्रथम), विलेषा संग्राम वेटे (द्वितीय), रोहन संभाजी मोरबाळे (तृतीय), अर्चित अभिजित जोशी (चतुर्थ) व प्रसाद प्रकाश परीट (पाचवा) यांनी तर हातकणंगले तालुका मर्यादीत गौरी सजावट स्पर्धेत सुमित शशिकांत पाटील (प्रथम), अभिषेक चंद्रकांत कुकडे (द्वितीय) व योगेश विलास बावणे (तृतीय) यांनी यश मिळविले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








