ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिर तर्फे आदर्श शिक्षक सत्कार समारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिर तर्फे आदर्श शिक्षक सत्कार समारंभ

इचलकरंजी (ता. ०४) : शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांच्या तर्फे यावर्षीचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून सन्मान केला जातो. त्यानिमित्त आपटे वाचन मंदिरातर्फेही शिक्षक गौरव पुरस्कार देण्याची परंपरा आहे.
यावर्षी प्रा. डॉ. त्रिशला कदम (श्रीमती आक्काताई पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी), प्रा. श्री. साजिद मणेर (दि न्यू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी), सौ. प्राची कुलकर्णी (डी.के.टी.ई. इंटरनॅशनल स्कूल, तारदाळ), सौ. सुरेखा कुंभार (विद्या मंदिर, लोकमान्य नगर, कोरोची) आणि सौ. रंजना घोरपडे (मुसळे बाल विद्या मंदिर, इचलकरंजी) या शिक्षकांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या सर्व शिक्षकांचा आदर्श शिक्षक सत्कार समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा