डीकेटीईचे प्रा. व्ही.बी. सुतार यांना पीएच.डी. पदवी
इचलकरंजी :
येथील डी.के.टी.ई. टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (इटीसी) विभागात कार्यरत प्रा. व्ही.बी. सुतार यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पीएच.डी. इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
गेल्या १७ वर्षांपासून ते डीकेटीईमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘नाईट टाईम ऍनिमल डिटेक्शन अँड कोलिझन ऍव्हॉइडन्स सिस्टीम फॉर इंटेलिजंट व्हेईकल्स’ या विषयावर प्रबंध सादर केला असून या संशोधनासाठी डॉ. सौ. के.व्ही. कुलहल्ली (डी.वाय. पाटील, कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले.
Advt
प्रा. सुतार यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. सौ. एल.एस. अडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस.ए. पाटील उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







