आ.राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे,स्वप्निल आवाडे,किशोरी आवाडे,मौश्मी आवाडे, उत्तम आवाडे,सपना आवाडे, वैशाली आवाडे, रवी आवाडे यांच्या उपस्थितीत औक्षण व केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वृक्षारोपण, अनाथाश्रमात भोजन, अंगणवाडीत फळवाटप, वृध्दाश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान, महिलांना साड्या, बालकांना खाऊ वाटप, मोफत आरोग्य तपासणी, मॅरेथॉन स्पर्धा, ज्ञानेश्वरी ग्रंथवाटप अशा उपक्रमांनी दिवसभर जनसंपर्काचा उत्सव रंगला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. दिवसभर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांनी भेट देत शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे, आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांतून पाच महिन्यांच्या बालिकेची मोफत हृदयशस्त्रक्रिया होऊन तिने कुटुंबियांसह अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. वाढदिवस समितीने केलेल्या सुरेख नियोजनामुळे कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दीची सांगता झाली.
आ.राहुल आवाडे यांना शुभेच्छा देताना संजय पाटील यड्रावकर,अजय पाटील यड्रावकर,माजी मंत्री प्रकाश आवाडे,मोशमी आवाडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







