इमनपाचे स्वच्छता अभियानासाठी नागरिकांना आवाहन
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने “स्वच्छता ही सेवा २०२५” उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “स्वच्छोत्सव – स्वच्छता ही सेवा २०२५” पंधरवडा राबविण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी “एक दिवस, एक तास, एक साथ” या उपक्रमात शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्याशी संपर्क साधून सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







