इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे मराठवाड्यातील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
इचलकरंजी :
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहर काँग्रेसच्यावतीने मराठवाड्यातील पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. या मदत उपक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तू जिल्हा काँग्रेस कार्यालयात सुपूर्त करण्यात आल्या.
या वेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, शहर काँग्रेसचे पदाधिकारी बाबासो कोतवाल, अजित मिणेकर, राजु काटकर व स्टीफन आवळे उपस्थित होते. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजातील विविध स्तरातून सहकार्य मिळत असून, काँग्रेस पक्ष सातत्याने लोकांच्या अडचणीत धावून जाण्याचे कार्य करत असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








