इंटर डिपार्टमेंट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी मनोज इनानी यांची निवड
इचलकरंजी
जमशेदपूर येथील ५ वी सीनिअर पुरुष इंटर डिपार्टमेंट हॉकी स्पर्धा ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान नवल टाटा हॉकी अकॅडमी, जमशेदपूर येथे होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत टेक्निकल ऑफिशियलपदी इचलकरंजीचे मनोज इनानी यांची निवड झाली आहे.
या वर्षी देशभरातील १८ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. मनोज इनानी यांनी यापूर्वी ऑल इंडिया मेजर पोर्ट ट्रस्ट, मुंबई सुपर लीग, एस. डी. पाटील सुवर्ण चषक, एनडीएसएफ, नमो चषक, पोलिस गेम्स पुणे, नाशिक तसेच नांदेड येथे झालेल्या ५० व्या गुरु गोविंद सिंह सुवर्ण चषकात टेक्निकल ऑफिशियल आणि अंपायर म्हणून कामगिरी बजावली आहे.
इनानी यांना दिग्विजय नाईक फाउंडेशन चे प्रमुख, आंतरराष्ट्रीय पंच श्री दिग्विजय नाईक, सुहास पाटील, संजय पोवाडे, हरीश देवाडिगा, अमोल थोरवत तसेच हॉकी महाराष्ट्र प्रमुख आयपीएस कृष्णप्रकाश सर, मनीष आनंद सर आणि मनोज भोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
दिग्विजय नाईक फाउंडेशनच्या सर्व खेळाडूंनी आणि सहकाऱ्यांनी मनोज इनानी यांना या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







